Published On : Thu, Sep 5th, 2019

न्यू रामदासपेठ झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे विद्यापीठाने त्वरित बैठक घेऊन ना हरकत प्रमाणपत्र द्यावे : पालकमंत्री

नागपूर: न्यू रामदासपेठेतील मौजा लेंढ्रा खसरा क्रमांक 132/1, 2, 3 काचीपुरा येथील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासाठी विद्यापीठाने आचारसंहितेपूर्वी त्वरित बैठक घेऊन या जागेचे ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विद्यापीठाला दिले.

या बैठकीला महापौर नंदा जिचकार, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकरराव देशमुख, आयुक्त अभिजित बांगर, एनएमआरडीए आयुक्त शीतल उगले, उपमहापौर दीपराज पार्डीकर, संजय बंगाले, पंचायत समितीचे माजी सभापती अजय बोढारे, नगरसेवक भगवान मेंढे, स्वाती आखतकर, विद्या मडावी व अन्य उपस्थित होते.

Gold Rate
Monday 03 Feb. 2025
Gold 24 KT 82,400 /-
Gold 22 KT 76,600 /-
Silver / Kg 93,300 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मौजा लेंढ्रा ही नोंदणीकृत स्लम असून या जागेचा सर्वे महापालिकेने केला. पण विद्यापीठाने तो स्वीकृत केला नाही. आजच्या बैठकीनुसार विद्यापीठाने त्वरित ना हरकत देणे आवश्यक आहे. या जागेवरील झोपडपट्टीधारकांना शासनाने संरक्षण दिले आहे. त्यांना हटविता येत नाही. अशा स्थितीत विद्यापीठाने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे व शासनाकडून या जागेचे खाजगी जमीन समजून पैसे देऊ असे पालकमंत्री म्हणाले.

मौजा तेलंखेडी मरियम नगरचा पीटीएस सर्वे झाला असून सर्व कागदपत्रे देण्यात आली आहे. नझूल विभागाने पुन्हा कागदपत्रे मागितली आहेत. त्यामुळे कामे थांबली आहे, याकडे संजय बंगाले यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.

पट्टेवाटप पश्चिम नागपूर
पश्चिम नागपुरातील पट्टेवाटप 30 जुलैपर्यंत करणार असे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतरही पट्टेवाटप झाले नाही, याकडे आ. सुधाकर देशमुख यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. झोपडपट्ट्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासाठी रजिस्ट्री होत नाही. अनेकदा बैठकी घेण्यात आल्या. 243 झोपडपट्टीधारकांनी रजिस्ट्रीचे शुल्क भरले आहे. पण रजिस्ट्री होत नाही. त्वरित रजिस्ट्री होण्याच्या दृष्टीने अधिक केंद्र सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी देत आचारसंहितेपूर्वी पट्टेवाटप करण्याचे निर्देश दिले.

पंकृविच्या जागेवरील वॉकिंग ट्रॅक आजच कार्यादेश द्या- पालकमंत्री
-आयुक्तांचे वाहतूक अभियंत्याला निलंबित करण्याचे आदेश

व्हीआयपी रोडवरील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवर नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक तयार करण्याचा निर्णय दोन वर्षापूर्वीच झाला. त्यासाठी निधीही देण्यात आला. पण अजून ट्रॅकच्या प्रक्रियेतच मनपा अडकली आहे. या कामाला होत असलेला विलंब आणि उदासीनता लक्षात घेता मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी वाहतूक अभियंता बोदिले यांना निलंबित करण्याची घोषणा या बैठकीत केली. याच वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजच्या आजच निविदा प्रक्रिया करून कायादेश देण्याच्या सूचना केल्या.

आजच्या बैठकीत ऐनवेळी आलेला हा विषय होता. पालकमंत्र्यांनी स्वत: या विषयाचा आढावा घेतला. यापूर्वीच्या बैठकीतही या विषयाचा आढावा घेण्यात आला होता. आयुक्तांनीही अनेकदा अधिकार्‍यांना या विषयासंदर्भात आठवण करून दिली असतानाही हे काम मागे कसे पडले. 9 ऑगस्टला निविदा बंद झाल्यानंतरही आजपर्यंत कारवाई नाही. यावरून प्रशासनातील अधिकारी गंभीर नाही, अशा भावना आयुक्तांनी व्यक्त केल्या.

Advertisement