Published On : Sun, Sep 3rd, 2017

महाराष्ट्राच्या सुपूत्रांना केंद्रीय मंत्रिमंडळात नव्या जबाबदाऱ्या

Advertisement

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे सुपूत्र नितीन गडकरी यांना जलसंपदा, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाचा अतिरीक्त पदभार देण्यात आला. राज्यातून राज्यसभेचे खासदार पियुष गोयल यांना रेल्वे व कोळसा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली असून सुरेश प्रभु यांना वाणिज्य व उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र प्रभार असणाऱ्या ४ मंत्र्यांना केंद्रीय मंत्रीपदाची तर ९ नवीन मंत्र्यांना राज्यमंत्री पदाची शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांसह अन्य गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.

Today’s Rate
Monday 04 Nov. 2024
Gold 24 KT 78,900 /-
Gold 22 KT 73,400 /-
Silver / Kg 95,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

केंद्रीय मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांच्या शपथविधी नंतर मंत्रिमंडळातील सदस्यांच्या विभागांची घोषणा करण्यात आली. यानुसार केंद्रीय रेस्ते वाहतूक व महामार्ग तथा जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांना जलसंपदा, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

Advertisement

उर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पियुष गोयल यांना कॅबीनेट मंत्र्याचा दर्जा देऊन त्यांच्याकडे रेल्वे आणि कोळसा मंत्रालयाचा पदभार देण्यात आला. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त तथा उत्तर प्रदेशातील बागपत येथून खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांनीही आज केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांना मनुष्यबळ विकास आणि जलसंपदा, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे.