Published On : Sat, Oct 30th, 2021
By Nagpur Today Nagpur News

नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पुढाकार घ्या

मनपा आयुक्तांचे आवाहन; १ नोव्हेंबरपासून विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम

नागपूर: भारतीय संविधानानुसार वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. परंतु, सर्वप्रथम १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वतःचे मतदार यादीत नाव नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी मुख्य निवडणूक आयोगाकडून १ ते ३० नोव्हेंबर २०२१ दरम्यान मतदार नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक आयोगामार्फत जारी आदेशानुसार नागपूर शहरातील १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण होत असलेल्या सर्व नवमतदारांनी मतदान यादीत आपले नाव नोंदविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी केले आहे.

Gold Rate
Tuesday 21 Jan. 2025
Gold 24 KT 79,700 /-
Gold 22 KT 74,100 /-
Silver / Kg 92,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये नवमतदारांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याची संधी आहे. ऑनलाईन नाव नोंदणीसाठी National Voter Service Portal (www.nvsp.in), Voter Portal Beta (https://voterportal.eci.gov.in/) किंवा Voter Helpline App (VHA) मोबाईल अँप आणि ऑफलाईन नोंदणीसाठी संबंधित मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणी करता येईल. तसेच आधीच नाव समाविष्ट असलेल्या मतदारांनी काही दुरुस्ती करावयाची असल्यास त्यासाठीसुद्धा अर्ज करावा असे, आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

या विशेष कार्यक्रमातून वंचित घटकांच्या नाव नोंदीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. बेघर किंवा पदपथावर राहणाऱ्या व्यक्ती, देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आणि तृतीयपंथी हे आवश्यक कागदपत्रांच्या कमतरतेमुळे मतदार यादीत नाव नोंदवू शकत नाही. अशांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने कागदपत्रांची विशेष सवलत दिली आहे. अशा व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आणि संघटनांनी पुढाकार घेऊन त्यांचे मतदार यादीत नाव नोंदवावे, असेही आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

नाव नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे :

मतदार म्हणून नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्या नागरिकाने अर्ज क्रमांक ६ भरणे आवश्यक आहे.

१. अर्जदार भारताचा नागरिक असावा

२. स्वतःचे छायाचित्र (पासपोर्ट साईज फोटो)

३. इतर कोणत्याही मतदार यादीत नाव नाही याविषयीचे प्रतिज्ञापत्र, जे अर्ज क्रमांक ६ मध्ये अंतर्भूत असते.

४. वयाचा दाखला

५. निवासाचा पुरावा

नाव नोंदणीनंतर पत्ता बदलल्यास काय करावं?

१. नवीन पत्ता आधीच्याच विधानसभा मतदारसंघातील असेल, तर अर्ज क्र. ८अ भरून नवीन पत्त्याची नोंद करावी.

२. नवीन पत्ता अन्य विधानसभा मतदारसंघातील असल्यास जुन्या मतदारसंघातील नाव वगळण्यासाठी अर्ज क्र. ७ भरावा. त्यानंतर नवीन मतदारसंघात नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज क्र. ६ भरावा.

Advertisement