नागपूर: नागपूर मनपा कर्मचारी सहकारी बँकेच्या वतीने नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त अश्विन मुदगल यांचा सत्कार करण्यात आला.
मनपा कर्मचारी बँकेचे अध्यक्ष विजय काथवटे यांनी आयुक्तांना शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी अध्यक्षांनी बँकेची वार्षिक अहवालाची प्रत देऊऩ बँकेच्या विविध शाखांची तसेच कर्ज योजनेची माहिती आयुक्तांना दिली.याप्रसंगी संचालक मंडळातील गौतम पाटील, सुरेंद्र टिंगणे, राजू भिवगडे, सुशील यादव, ईश्वर गेडाम, दिलीप चौधरी, विठ्ठल क्षिरसागर, प्रदीप डाखोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रृंगारपवार, कर्मचारी व अधिकारी मोठ्या संस्खेने उपस्थित होते.