मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षात घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी भाजपला सोडचिट्ठी दिली आहे. आता निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे
. माजी खासदार निलेश राणे हे उद्या (23 ऑक्टोबर) 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.यासंदर्भात निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती देखील दिली आहे.
यावेळी निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार देखील मानले आहेत. याशिवाय यंदाची विधानसभा निवडणूक आम्ही महायुती म्हणून सामोरे जाऊन निवडून येणार असल्याचे निलेश राणे म्हणाले आहेत.याशिवाय निलेश राणे यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करण्यापूर्वीच त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइल फोटोवर त्यांच्या फोटोसह शिंदे गटाचं चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण जोडले आहे.