Published On : Mon, Oct 7th, 2019

रामटेक विधानसभेत नऊ उमेदवार निवडणुक रिंगणात

कन्हान / रामटेक : – होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत रामटेक विधानसभे करिता एकुण नऊ उमेदवार रिंगणात असुन तिरंगी लढत होण्याची राजकिय वर्ळतुळात चर्चा रंगत आहे .

रामटेक विधानसभा करिता शेवटच्या दिवशी ४ ऑक्टोबर ला एकुण १४ उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. दि. ५ ऑक्टोबर ला शरद डोणेकर व स्वाभिमान रामटेके यांचे छाननी मध्ये दोन अर्ज रद्द करण्यात आले. दि.७ ऑक्टोबर ला ३ वाजेपर्यंत १) चंद्रपाल नत्थुसाव चौकसे, २) विशेष वसंतराव फुटाणे ३) रामेश्वर मंगल इनवाते यांचे तीन उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने आता रिंगणात एकुण नऊ उमेदवार आहेत.

Gold Rate
Saturday 22 Feb. 2025
Gold 24 KT 86,600 /-
Gold 22 KT 80,500 /-
Silver / Kg 97,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यात १) उदयसिंग सोंहनलालजी यादव कॉंग्रेस चुनाव चिंन्ह (हात) २) डी मल्लिकार्जुन रेड्डी भाजपा (कमळ ), ३) संजय विठ्ठलराव सत्येकार बसपा (हत्ती) ४) ईश्वर चैत्रराम गजबे आम आदमी पार्टी (झाडु) ५) रमेश प्रभाकर कारेमोरे प्रहार जनशक्ती पक्ष (कपबशी) ६) भगवान भैया भोंडे वंचित बहुजन आघाडी (गँस सिंलेडर) ७) आशिष नंदकिशोर जैस्वाल अपक्ष (ट्रँक्टर चालविणारा शेतकरी) , ८) मुकेश मधुकर पेंदाम अपक्ष (करवत), ९) सत्येंद्र (बंटी)रतनलाल गेडाम अपक्ष ( ऊस शेतकरी ) असे एकुण ९ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तसेच उपविभावीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी दिली.

Advertisement