वर्धा: वैद्यकीय क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून ते एक मिशन आहे. सर्वसामान्य माणसे ईश्वरानंतर सर्वाधिक विश्वास डाॅक्टरांवर ठेवतात. तुम्ही समाजातील देवदूत आहात. समाजातील शेवटचा माणूस तुमच्या केंद्रस्थानी असला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारोहात केले. सावंगी (मेघे) येथील विद्यापीठ सभागृहात या समारोहात विद्याथ्र्यांनी कुलपती दत्ता मेघे यांच्याकडून दीक्षा प्राप्त केली. यावेळी मध्यभारतातील ख्यातनाम आरोग्यतज्ज्ञ डाॅ.बी.जे. सुभेदार यांना डाॅक्टरेट इन मेडिकल सायन्सेस् या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. तर, वैद्यकीय शाखेतील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी रितिका त्रिपाठी ही सर्वाधिक सुवर्णपदकांची मानकरी ठरली.
या समारोहात गुणवत्ताप्राप्त विद्याथ्र्यांना एकूण 88 सुवर्ण पदके व 4 रौप्य पदकांसह 13 चान्सलर अवाॅर्ड आणि रोख पुरस्कार प्रदान करण्यात आलेत. यात रितिका त्रिपाठी हिला 8 सुवर्ण पदके व 3 रोख पुरस्कार, डाॅ. तन्मय गांधी यांना 7 सुवर्ण पदके, डाॅ. हरमनदीप सिंग यांना 4 सुवर्ण पदके, वसुधा उमाटे हिला 3 सुवर्ण, 1 रौप्य पदक व 3 रोख पुरस्कार, भेषना साहू व सत्यजीत साहू यांना प्रत्येकी 3 सुवर्ण पदके व 1 रोख पुरस्कार तर आश्लेषा शुक्ला हिला 3 सुवर्ण पदके प्राप्त झाली. यासोबतच विविध आयुर्विज्ञान शाखेतील एकूण 118 विद्याथ्र्यांना गौरवान्वित करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाÚया 23 व्यक्तींना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. याशिवाय, 15 विद्याथ्र्यांना फेलोशीप आणि 5 विद्याथ्र्यांना मेडिकाॅन युवा वैज्ञानिक पुरस्कारही प्रदान करण्यात आले. या समारोहात वैद्यकीय शाखेतील 298 व दंतविज्ञान शाखेतील 160 (पीएचडी, एमडी, एमएस, स्नातकोत्तर, स्नातक), आयुर्वेद शाखेतील 85 परिचर्या शाखेतील 137 तर परावैद्यकीय शाखेतील 19 विद्याथ्र्यांसह एकूण 700 विद्यार्थी कुलपती दत्ता मेघे यांच्याकडून आरोग्यसेवेची दीक्षा घेतली. आज माहितीचे, ज्ञानाचे अनेक स्त्रोत उपलब्ध आहेत. मदतीला नवी उपकरणे आहेत. त्याचा लाभ घेत युवा पिढीने नवसंशोधनावर भर द्यावा. बौध्दिक विकासासोबतच शारीरिक सुदृढतेकडेही लक्ष दिले पाहिजे, असे मनोगत डी.एम.एस्सी. या मानद पदवीने सन्मानित करण्यात आलेले 90 वर्षीय डाॅ. बी.जे. सुभेदार यांनी व्यक्त केले.
समारोहाला कराडच्या कृष्णा आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डाॅ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डाॅ. राजीव बोरले, प्र-कुलगुरू डाॅ. नीलम मिश्रा, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सागर मेघे, अशोक चांडक, डाॅ. बी.जे. सुभेदार, मुख्य समन्वयक डाॅ. एस. एस. पटेल, डाॅ. सतीश देवपुजारी, कुलसचिव डाॅ. ए.जे. अंजनकर, वैद्यकीय शाखेचे अधिष्ठाता डाॅ. अभय मुडे, दंतविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डाॅ. अशोक पखान, डाॅ. मीनल चैधरी, आयुर्वेद शाखेचे अधिष्ठाता डाॅ. श्याम भुतडा, रवी मेघे, भौतिकोपचार शाखेचे डाॅ. अथरुद्दीन काझी, डाॅ. सोहन सेलकर, डाॅ. संदीप श्रीवास्तव, डाॅ. व्ही.के. देशपांडे, डाॅ. सुब्रत सामल, डाॅ. प्रीती देसाई, डाॅ. प्रज्ञा निखाडे, डाॅ. आदर्शलता सिंग, डाॅ. सुनीता श्रीवास्तव, परिचर्या शाखेच्या सीमा सिंग, वैशाली ताकसांडे, राजीव यशराय, डी.एस. कंुभारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन डाॅ. नाझनी काझी आणि डाॅ. श्वेता पिसूळकर यांनी केले. या समारोहाची सुरुवात विद्यापीठगीताने झाली. डाॅ. प्रियंका निरंजने यांनी पसायदान सादर केले. राष्ट्रगीताने या दीक्षान्त समारोहाची सांगता झाली.