नागपूर: नागपूर सुधार प्रन्यास येथे आज नासुप्रच्या विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सन २०१८-२०१९ या वित्तीय वर्षाचा रु. ६११ कोटी ९१ लक्ष चा अर्थसंकल्प विश्वस्त मंडळासमोर सादर केला. नागपूर सुधार प्रन्यासला ८१ वर्ष पूर्ण झाली असून नागपूर सुधार प्रन्यासची वाटचाल नागपूर महानगर क्षेत्रात होत आहे. नागपूर शहरातील मुलभूत सोयी सुविधा आणि शहराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी नासुप्र द्वारे आता पर्यंत विविध उपक्रम हाती घेण्यात आले, ज्यामध्ये सर्वसाधारण विकास योजना, पुनःनिर्माण योजना, रस्ते, निवास, भावी विस्तार, जल व मल निस्सारण योजना, अभिन्यासाचा विकास करण्यासाठी रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या वाहिका, नळवाहिका, पावसाळी पाणीवाहिका अशी विविध कामे नासुप्रने स्वतःच्या निधीतून यशस्वीरित्या नागपूर शहरात केलेली आहेत.
नागपूर सुधार प्रन्यासच्या सन २०१८-१९ चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकासोबत सन २०१७-२०१८ या वित्तीय वर्षाचे अंदाजपत्रक विश्वस्त मंडळासमोर सादर करण्यात आले. सन २०१७-१८ या वर्षाच्या सुधारित अनुमानानुसार एकूण जमा (सुरवातीचा शिल्लक धरून).
रु. ८१० कोटी ६२ लक्ष आहे. सन २०१८ -१९ या वित्तीय वर्षात रु.४ कोटी ०९ लक्ष शिल्लकीचे अंदाजपत्रक नासुप्रच्या विश्वस्त मंडळासमोर सादर करण्यात आले.
यावेळी नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त (अध्यक्ष स्थायी समिती म.न.पा.) विक्की कुकरेजा, भूषण शिंगणे,म.न.पा. आयुक्त अश्विन मुदगल,सहसंचालक नगर रचना.
नि.सी.अढारी, महाप्रबंधक अजय रामटेके, अधिक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार,कार्यकारी अधिकारी प्रशांत भांडारकर,मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. हेमंत ठाकरे,वित्त अधिकारी पंडित घुगे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
सन 2018 – 19 चे अनुमानित अंदाजपत्रकमधील ठळक वैशिष्ट्ये :
- सन २०१८-२०१९ या वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकानुसार सुरुवातीची शिल्लक रु. ३ कोटी ५१ लक्ष धरून एकूण जमा रु.६१६ कोटी अपेक्षित आहे.
१.) सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षामध्ये ५७२ व १९०० अभिन्यासमध्ये एकंदर रु.४१ कोटी १० लक्ष प्राप्त होने अपेक्षित असून ५७२ व १९०० अभिन्यासमध्ये मुलभुत सुविधा पुरविन्यासाठी रु. ४५ कोटी ५५ लक्ष खर्च करण्यात येत असून नासुप्र निधितुन अनधिकृत अभिन्यासतिल मंजूर/नामंजूर लेआउट च्या विकासकरिता रु. ४० कोटी खर्च करण्याचे प्रावधान करण्यात आलेले आहे.
२.) सन २०१८-२०१९ चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात दलित वस्ती सुधार योजना, आमदार निधि, खासदार निधि, व महानगरपालिका क्षेत्रात मुलभुत सुविधा पुरविण्याकरिता विशेष अनुदान इत्यादि शिर्षखाली एकंदर रु.२० कोटी १५ लक्षचा खर्च अपेक्षित आहे. या अनुदानातून नागपूर शहरात समाज भवन, रस्ते, फुटपाथ, मलवाहिका, जलवाहिका, पावसाळी पाणी वाहिका इत्यादि कामें करण्यात येतील.
३.) नागपूर सुधार प्रन्यासच्या निधितुन सन २०१८-२०१९ मध्ये विकासाची विविध कामे व डांबरीकरण व सिमेंट रोड बांधकाम या शिर्षाअंतर्गत रु. ९७ कोटी खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
४.) नासुप्रचे अंबाझरी स्थित जलतरण तलावाचे बांधकाम व दुरुस्ती करीता प्रन्यास निधितून सन २०१८-२०१९ मध्ये रु. २ कोटी ५० लक्ष ची तरतूद करण्यात आलेली आहे.
५.) नागपूर निधी महाविद्यालय येथे संविधान प्रस्ताविका पार्क करिता सन २०१८-१०१९ मध्ये रु. २ कोटी ५३ लक्ष ची तरतूद करण्यात आलेली आहे.
- या आर्थिक वर्षात नासुप्रद्वारे राबविलेले/सुरु केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम :
१. नासुप्रद्वारे या वर्षी ८१३६ मागणी पत्र (डिमांड लेटर) देण्यात आले.
२. नासुप्रद्वारे या वर्षी नागपूर शहरातील अभिन्यासमाधील भूखंडाचे ४०९० प्रकरणात नियमितीकरण करण्यात आले.
३. नासुप्रने कमीत कमी कागदाचा वापर(Less Paper Office) संकल्पना अंतर्गत संगणकीकरण करून व अभिलेख्याचे स्कॅनींग करून सर्व अभिलेखस्कॅन करण्याचे नियोजन करण्यात आलेले असून आजपर्यंत एकून १८,८२,००० अभिलेखाचे स्कॅनींग झालेले आहे.
४. नागपूर शहरातील नासुप्रच्या जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना मालकी ह्व्काचे पट्टेदेण्याची मागणी बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होती ही मागणी शासनाद्वारे मान्य करण्यात आली असून नागपूर शहरातील डीप्टी सिंग्नल,पँथरनगर,आदर्श नगर,नेहरू नगर,प्रजापती नगर येथे एकूण २४८२ पट्टे वाटप करण्याचे प्रस्तावित होते त्यापैकी आतापर्यंत नासुप्रद्वारे ५४५ पट्टे वाटप करण्यात आली आहे. तसेच नागपूर शहरातील नासुप्रच्या जागेवर बसलेल्या इतर झोपडपट्ट्याचे सर्वेक्षणाचे काम नासुप्र ने हाती घेतले होते ज्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून आज नासुप्रच्या विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठीमध्ये संजय गांधी नगर(दक्षिण नागपूर),सोनबाजी नगर(पूर्व नागपूर),गुलाबबाबा झोपडपट्टी(मध्य नागपूर),इंदिरा नगर(उत्तर नागपूर)येथील एकूण ६५१ झोपडपट्टी धारकांना पट्टे वाटपा करिता विश्वस्त मंडळाने मंजुरी प्रदान केली आहे.
५. राजीव गांधी सभागृहाच्या बाजूला मोकळ्या जागेवर आरोग्य उद्यानाचे रु. ७८ लक्षचे काम पूर्ण झालेले आहे.
६. ओमकार नगर चौक रिंग रोड ते बेसा पर्यंत सिमेंट रस्त्याच्या कामाकरिता रु. ८ कोटी ६७ लक्ष खर्च करून सदर काम पूर्ण करण्यात आले आहे.
७. मौजा मानेवाडा बालाजी नगर येथे ई-लायब्ररी चे काम नासुप्र निधीतून करण्यात येत सदर कामाची लागत रु.३ कोटी आखल्या गेली असून, आतापर्यंत रु. १ कोटी ५० लक्षचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे.
८. मानेवाडा रिंग रोड ते बेसा चौक रस्त्याचे आयआरडीपी (Integrated Road Development Project) निकषानुसार रुंदी कर्णाचे काम नासुप्र निधीतून करण्यात येत असून सदर कामाची अनुमानित लागत ५ कोटी ७० लक्ष असून असून, आतापर्यंत रु. ३ कोटी ५० लक्षचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे.
९. नासुप्रच्या मुख्य कार्यालयाच्या बांधकामात स्थापत्य कामाव्यतिरिक्त नवीन फर्निचर,इलेक्ट्रिक फिटिंग(LED),कुलिंग सिस्टम(Ducting) अत्याधुनिक सोईचे सभागृह इत्यादीचा सामावेश आहे. तसेच इमारतीवर ६० किलोवॅट क्षमतेचा सोलर प्लॅन्ट लावण्यात आलेला आहे ज्यामुळे नासुप्र च्या विद्युत देयकात अंदाजे रु. १ लक्ष प्रती माह बचत होत आहे.