Published On : Wed, May 17th, 2023
By Nagpur Today Nagpur News

उत्तर नागपुरातील अतिक्रमित भागात एनआयटीने चालविला बुलडोझर !

Advertisement

नागपूर : नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट (एनआयटी) यंत्रणा शहरातील अतिक्रमित भागावर कारवाई करण्याचे काम करते. यात उत्तर नागपुरातील यशोधरा नगर , शिवाजी स्क्वेअर, टिपू सुलतान स्क्वेअर, यशोधरा नगर स्क्वेअर, भावनगर, प्रवेश नगर, गरीब नवाज नगर येथील भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आले.सुमारे 287 अनधिकृत युनिट्स एनआयटी अधिकाऱ्यांनी पाडले आहे.

उत्तर नागपुरातील अतिक्रमित भागात करण्यात आलेल्या कारवाईचे नेतृत्व एस एम पोहेकर, कार्यकारी अभियंता (उत्तर), कमलेश टेंभुर्णे, विभागीय अधिकारी (उत्तर) आणि इतर अधिकाऱ्यांनी केले. अतिक्रमण विरोधी पथकाला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

मौजा भामटी येथील शंकर साओजी भोजनालयाचे अतिक्रमण एनआयटीच्या पथकाने जमीनदोस्त केले.खसरा क्रमांक 27 (भाग) आणि 54 (भाग) वर भोजनालय तयार झाले होते आणि एनआयटीचे विभागीय अधिकारी, पश्चिम यांनी मालकाला नोटीस बजावून संरचना काढून टाकण्यास सांगितले होते. परंतु भोजनालय मालकाने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याने एनआयटीच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Advertisement