नागपूर: सोमवार, ३१ डिसेंबर २०१८ रोजी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हुणुन पदभार स्वीकारला. २००९ बॅचच्या आईएएस अधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांची पुणे महानगर पालिकेच्या आयुक्त पदावरून बदली झाल्यानंतर त्यांनी आज नासूप्रच्या मुख्यलयात नासूप्रचे सभापती आणि नामप्रविप्रा’चे आयुक्त म्हणून आवश्यक कागदपत्रांवर सही करून या पदांचा कार्यभार स्वीकारला.
यावेळी नामप्रविप्रा’चे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. सुधाकर कुळमेथे, श्री. महा व्यवस्थापक श्री. अजय रामटेके, अधिक्षक अभियंता श्री. सुनील गुज्जेलवार, कार्यकारी अधिकारी श्री. पी. पी. धनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी(नामप्रविप्रा) श्री. हेमंत ठाकरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी(नासूप्र) श्रीमती सुप्रिया जाधव, नगर रचनेचे सह संचालक श्री. आर.डी. लांढे व इतर नासूप्रच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.