नागपूर : भारत सरकार च्या नीति आयोगाने नागपूर महानगरपालिका आणि OCW ह्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या नागपूर २४x७ पाणी पुरवठा प्रकल्पाच्या यशस्वी अमलबजावणीसाठी प्रशंसा केली असून इतर राज्यांनीदेखील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्यासाठी अशाच प्रकारच्या योजना राबवण्याचा सल्ला दिला आहे.
नीति आयोगाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या Composite Water Management Index-ऑगस्ट २०१९ नुसार असे सांगण्यात आले आहे कि, भारतातील सर्व राज्यांनी नागपूर महानगरपालिका आणि OCW ह्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या नागपूर २४x७ पाणी पुरवठा नागपूर २४x७ पाणी पुरवठा योजना प्रकल्पाकडून धडे घेत आप आपल्या राज्यात काम करावे व प्रत्येक नागरिकापर्यंत पाणी पोचवावे.
आधुनिक तंत्रज्ञान व व्यवसायिक अनुभव यांच्या सहाय्याने प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध विभागांनी खासगी क्षेत्रातील कंपन्यांची मदत घ्यावी. सादरीकरणावर आधारित मोबदला व योग्य देखरेख यांच्या मदतीने अशा प्रकल्पांना आर्थिक शाश्वती व नागरिकांना उत्तम सेवा मिळू शकेल.
या अहवालानुसार राज्यांनी प्रथम प्रायोगित तत्वावर असे नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवून त्यानंतर मोठ्या प्रमाणावर याची अमलबजावणी करावी. जेणेकरून लहान प्रमाणात याची चाचणी होऊन त्यातून आलेल्या अनुभवावर मोठ्या प्रमाणावर या योजना लागू करता येतील. यातून भविष्यात काय आव्हाने येऊ शकतात याचा ही अंदाज येऊ शकेल.
हा नागपूर महानगरपालिका आणि OCW ह्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या नागपूर २४x७ पाणी पुरवठा प्रकल्प पीपीपी तत्वावर लागू करण्यात आलेला आहे. यात खासगी ऑपरेटर शहरभरतील पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी जबाबदार आहे. यामध्ये असमान पाणीपुरवठा, असमान दाब व हिशेबबाह्य पाण्याचे प्रचंड प्रमाण या समस्यांना हाताळणे हे समाविष्ट आहे.
या अंतर्गत संसाधनांची मालकी नागपूर महापालिकेकडे असून यासाठी लागणारी गुंतवणूक केंद्र व राज्य सरकार यांचेकडून जेएनएनयुआरएम अंतर्गत करण्यात आलेली आहे.तसेच एकूण यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती खासगी ऑपरेटरकडे आहे.
या प्रकल्पामुळे शहराला पाणी उपलब्धता, प्रभावी व्यवस्थापन व हिशेबबाह्य पाण्यामुळे होणाऱ्या नुकसानात घट ई बाबींमध्ये खासगी ऑपरेटरच्या अंतर्भावामुळे फायदा झालेला आहे.
या प्रकल्पाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मंचांवर सम्मानित करण्यात आलेले आहे. यामध्ये बेस्ट वॉटर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस व बेस्ट पीपल्स इनिशिएटिव्ह यासारख्या पुरस्कारांचा समावेश आहे.