भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगराच्या माध्यमातुन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने मागील ३ वर्षांपासुन उन्ह्याळ्यात रक्तसाठ्याची कमतरता लक्षात घेता भाजयुमो नागपुर महानगरातर्फे संपुर्ण शहरात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे घेण्यात येतात. प्रथम वर्षी ४,५००, द्वितीय वर्षी ६००० लोकांनी रक्तदान केले. यावर्षी १०,००० लोकांचा रक्तदानाचा संकल्प युवा मोर्चाने केला आहे. ज्यामध्ये आता पर्यंतच्या रक्तदान शिबिरांमध्ये एकुण ४,००० लोकांनी रक्तदान केलेले आहे. आज शहरातील सहा विधानसभांमध्ये क्षेत्रामध्ये २२ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
ज्यामध्ये प्रभाग क्रमांक ४५ मध्ये अतिशय उन्हात देखील १५० लोकांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीराला प्रमुख्याने आमदार मोहन मते उपस्थित होते.
येणार्या दिवसांमध्ये २७ मे आदरणीय नितीनजींच्या वाढदिवसापर्यंत जास्तीत जास्त युवकांच्या माध्यमातुन शहरात रक्तदान होऊन रक्ताची कमतरता राहणार नाही असा विश्वास भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांना व्यक्त केला.
सर्व शिबीरांच्या यशस्वीतेकरीता भाजपा शहर अध्यक्ष प्रविण दटके व भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, संपर्कमंत्री मनिष मेश्राम, मंडळ अध्यक्ष अमर धरमारे, बादल राऊत, निलेश राऊत, शेखर कुर्यवंशी, पंकज सोनकर, सनी राऊत हे प्रामुख्याने नियोजन करत आहे. रक्तपेढींचे संयोजन भाजयुमो प्रदेश कार्यकारिणी सदस्य रितेश राहाटे आणि रितेश गावंडे हे सांभाळत आहेत.