प्लाझ्मा, रक्तदान, एन्टीबॉडी चेकअप, वृक्षारोपण, मास्क-सेनीटायझर वाटप
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचा वाढदिवसाच्या अनुषंगाने पूर्व नागपुरात सेवा सप्ताह कार्यक्रम मागील एक महिन्यापासून सुरु आहे. पूर्व नागपुरात सर्व 10 प्रभागात झालेल्या विविध शिबिरात 2365 नागरिकांनी एन्टीबॉडी चेक केली, 319 लोकांनी प्लाझ्मा डोनेट केले, 555 युवकांनी रक्तदान केले, 2000 वृक्ष लागवडीची सुरुवात झाली, मास्क व सेनिटायझरचे वाटप बाजारपेठेत करण्यात आले. युवा मोर्चा च्या वतीने मेयो-मेडिकल-डागा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन वाटप करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाला पूर्व नागपुरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
गडकरी साहेबांनी कोरोना काळात केलेल्या भूमिकेचे नागपूर शहरातच नव्हे तर संपूर्ण देशातील नागरिकांनी स्वागत केले. ऑक्सिजन, इंजेक्शन, सरकारी व खाजगी कोविड हॉस्पिटल, वेंटीलेटर, ऑक्सिजन प्लांट, अॅम्बुलंस, ऑक्सिजन मशीन, सिलेंडर या सर्वात अग्रणी भूमिका घेतल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले. गडकरी साहेबांनी केलेल्या कामगिरीमुळे नागपूर शहरात कोरोन रोखण्यात यश आले. शहरातील अनेक नागरिकांचे जीव वाचविण्याचे पुण्याचे काम गडकरी साहेबांच्या हातून घडले. याकरिता गडकरी साहेबांचे निश्चितच कौतुक व अभिनंदन केले पाहिजे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारा नेता म्हणजे नितीन गडकरी, अशाप्रकारे सेवाकार्याच्या माध्यमातून आमदार कृष्णा खोपडे यांनी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सेवा सप्ताह राबविण्यात संजय अवचट, बाल्या बोरकर, प्रमोद पेंडके, रामभाऊ आंबुलकर, मनिषा धावडे, प्रदीप पोहाणे, चेतना टांक, मनिषा कोठे, कांता रारोकर, सरिता कावरे, हरीश दिकोंडवार, राजकुमार सेलोकर, मनिषा अतकरे, अभिरुची राजगिरे, मनोज चापले, धर्मपाल मेश्राम, बंटी कुकडे, अनिल गेंडरे, दिपक वाडीभस्मे, वैशाली वैद्य, जयश्री रारोकर, समिता चकोले, वंदना भुरे, रेखा साकोरे, महेंद्र राऊत, सेतराम सेलोकर, राजू गोतमारे, जे.पी.शर्मा, सुनिल सूर्यवंशी, सन्नी राऊत, सचिन करारे, विनोद बांगडे, मनोहर चिकटे, नाना पडोळे, विनय जैन, संदीप साबू, मंगेश धार्मिक, गुड्डू पांडे, वर्षा मिलमिले, हरीश राजगिरे, कपिल उमाळे, संजय बल्की, घनश्याम ढाले, संतोष लढढा, शैलेश मौर्य, प्रेम कुर्रे, मुरलीधर वडे, गणेश पौनीकर, राजेश ठाकूर, अतुल खोब्रागडे, किशोर डवले, संजय वानखेडे, आशिष मर्जीवे, सुरेंद्र समुंद्रे, नरेश चीरखारे, अभय मोदी, भारत सारवा, शंकर गौर, श्याम शिंदे, संजय मानकर, देवेंद्र बिसेन, राजू दिवटे, कपिल लेंडे, राजेश संगेवार, सुरेश बारई, प्रशांत मानापुरे, प्रवीण बोबडे, विजय ढोले, पिंटू गिर्हे, आशिष कनोजे, प्रितम देशमुख व अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.