नागपूर: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून लवकरच निकाल स्पष्ट होणार आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात नवव्या फेरीत भाजप उमेदवार नितीन गडकरी 60,143 मतांनी आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे विकास ठाकरे हे पिछाडीवर आहेत. आकडेवारीनुसार नितीन गडकरी यांना 3,27,205 इतकी मते मिळाली असून विकास ठाकरे यांना 2,67,062 इतकी मते मिळाली आहेत.
दरम्यान लोकसभेच्या 48 जागा असलेल्या महाराष्ट्रात महायुतीकडून भाजपाने 28, शिवसेना शिंदे गटाने 15, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 4 आणि रासपने 1 जागेवर निवडणूक लढवली होती.
तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने 21, काँग्रेसने 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने 10 जागांवर निवडणूक लढवली होती.