नागपूर: नागपूर :- नरेंद्र मोदी सरकारमध्ये 2014 पासून तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी केंद्रीय परिवहन व रस्ते मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. मंत्री पदावर रुजू झाल्यानंतर गडकरी हे उद्या नागपुरात येणार आहे.
नागपूर शहर अध्यक्ष जितेंद्र उर्फ बंटी कुकडे यांनी सांगितले की, गुरुवारी सायंकाळी पाच वाजता त्यांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात करण्यात येणार आहे. यावेळी सर्व विद्यमान व माजी आमदार, माजी नगरसेवक, राष्ट्रीय ते बूथ स्तरावरील अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान विकास कामांमुळे देशभरात स्व:ताची वेगळी ओळख निर्माण करणारे नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते आणि नवनिर्वाचित खासदार नितीन गडकरी यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.