नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक खात्याच्या एका रस्ते प्रकल्पाच्या किंमतवाढीची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. महत्त्वाचे महाजन या खात्याचे मंत्री हे नितीन गडकरी आहेत. द्वारका एक्स्प्रेस वे (Dwarka Expressway) मार्गावर प्रती किलोमीटर १८ कोटी २० लाख रुपये बांधकामाचा खर्च तब्बल २५० कोटी ७७ लाख रुपयांवर पोहोचला आहे. यासंदर्भात कॅग (CAG) अर्थात भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. कॅगच्या अहवालानंतर गडकरींच्या रस्ते वाहतूक खात्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
कॅगच्या अहवालानंतर गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिठ्ठी लिहत आपल्या खात्यात झालेल्या व्यवहारसंदर्भात माहिती देत स्पष्टीकरण दिल्याची माहिती आहे. गडकरींच्या या पत्रानंतर पंतप्रधान मोदी हे त्याची पाठराखण करणार की कॅगच्या अहवालावर विश्वास ठेवणार हे पाहावे लागले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॅगच्या अहवालातून मोदी सरकारच्या योजनांममधील साथ मोठे घोटाळे उघडकीस आले आहे. यात नितीन गडकरींच्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयात मोठा फेरफार झाल्याचे समोर आले. यानंतर राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत. कॅगचा अहवाल म्हणजे गडकरींना पक्षांतर्गत राजकारणातून वेगळे करण्याचा पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा प्लॅन तर नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात धडाकेबाज पद्धतीने विकासकामे करणारे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा भ्रष्टाचार च्या आरोपावरून पक्षश्रेष्ठींच्या रडावर आले आहेत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीतून त्यांचा पत्ता कट करण्याचा डाव मोदी आणि शहा यांनी आखल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे मोदी लोकसभेसाठी महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांना संधी देणार असेही बोलल्या जात आहे. आता कॅगच्या अहवालामुळे गडकरींचे राजकीय अस्तित्व धोक्यात असल्याचे दिसते.