नागपूर: आर्य बिशप अब्राहम विरोतकुरंगारा यांच्या निधनाबद्दल बिशप हौवूस परिसरात केंद्रिय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भेट देवून त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली.
त्यांच्या समवेत आमदार सुधाकर देशमुख, कैथालिक असोशिएशनचे माजी सचिव जेष्ठ पत्रकार जोसेफ राव आदी उपस्थित होते.
यावेळी विकार जनरल फादर जेरोम पिंटो, फादर अल्बर्ट डिसुजा, फादर पेट्रीक लामस, फादर लिज्जो, अँड पिटर घाडगे, विजय फर्नाडिंस, संजय फ्रांन्सिस, नेल्सन फ्रान्सिस, विकास फ्रान्सिस आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.