बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका विधानामुळे मोठी खळबळ माजली आहे.भाजप नेते नितीन गडकरी हे मोठे काम करतात. पण त्यांना भाजपने साईडलाइन केले, असे वक्तव्य सुळे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.
ते भाजपमध्ये आहेत पण आम्हाला प्रेम देतात. ते दुसऱ्या पक्षात असले तरी चांगले काम करीत आहेत त्यामुळे त्याची स्तुती करायलाच पाहिजे. एवढंच नव्हे तर भाजपने गडकरींना साईडलाईन केले,असे मोठं विधानही त्यांनी केले. जनता, देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागत आहे. मला त्यांचं वाईट वाटतं बिचारे १०५ आमदार आले आणि १० मार्क असताना ५ कमी केले आणि त्यांना उपमुख्यमंत्री केले. परत दोन उपमुख्यमंत्री केले अडीच मार्कवर आणले. १० पैकी अडीच मार्क सांगा मग पास की नापास? असा सवाल त्यांनी विचारला.
दरम्यान बारामती मतदार संघातील लोक अनेक कामे घेऊन मुंबईत येत असतात, त्यामुळे मी बारामतीत नागरिकांना येऊन भेटते. बारामती लोकसभा मतदारसंघापुढे पाणी,बेरोजगारी आणि हमीभाव ही मोठी आव्हाने उभी आहेत. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे सुळे म्हणाल्या.