नवी दिल्ली : ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केलेल्या आरोपांबाबत खेद व्यक्त केल्यानंतर भाजपा नेता आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सिंह यांच्यावरील मानहानीचा दावा परत घेतला आहे. दिल्लीच्या पाटियाला हाऊस येथे दोन्ही पक्षांनी समझौत्याच्या दस्तावेजावर हस्ताक्षर केले. दिग्विजय सिंह यांनी नितीन गडकरी यांच्याबाबत दिले गेलेले वक्तव्य पॉलिटीकल हीटमध्ये दिले गेले होते. यात कुठलेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. याबाबत नितीन गडकरी तसेच दिग्विजय सिंह यांनी संयुक्त रुपाने न्यायालयात अर्ज दाखल करून प्रकरण मिटवण्याची विनंती केली होती, जी न्यायालयाने स्विकारली आहे.
2014 साली काँग्रेस नेता दिग्विजय सिंह यांनी नितीन गडकरीवर आरोप केला होता कि नितीन गडकरी त्यांच्या पक्षाचे नेते अजय संचेती यांच्यासोबत व्यवसायिक संबंध आहे. त्यावेळी दिग्विजय सिंह यांनी कोळसा ब्वॉक वाटपात कथित रुपाने झालेल्या घोटाळ्यात गडकरी यांनी संचेती यांना कोळसा ब्लॉक वाटपातून 490 कोटी रुपये कमाविल्याचे म्हटले होते. जेव्हा कि गडकरी यांनी दिग्विजय सिंह यांचे आरोप फेटाळून लावले होते.