Published On : Fri, May 29th, 2020

नितिन गडकरी च्या जन्मदिवसी गरीब, गरजुना राशन किटचे वितरित

Advertisement

कन्हान – केंद्रीय सडक परिवहन व लघु , सुक्ष्म उद्योग मंत्री नितिन गडकरी यांचा जन्मदिवसी भाजपा कन्हान शहर व्दारे गरिब नागरिका सोबत केक कापुन एक मेकांना खाऊ घालुन गरिब,ऑटो चालक व गरजुना राशन किट वितरण करून जन्मदिवस साजरा करण्यात आला.

केंद्रीय मंत्री मा नितीन गडकरी यांनी कोरोना संकट काळी कोणीही भाजपा प दाधिकारी, कार्यकत्यांनी माझ्या घरी येऊ न जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ नये असे आवाहन केल्याने भाजपा कन्हान शहर पदाधिका-यांनी चौथ्या संचारबंदीत सोश ल डिस्टसिंगचे पालन करित शहरातील गरीब गरजु सोबत केक कापुन एकदुस-याना खाऊ घालुन गरीब, मजदुर, आॅटो चालक गरजुना भाजपा कन्हान शहर पदाधिका-यानी राशन किटचे वितरण करून मा. नितिन गडकरी यांचा जन्मदि वस साजरा केला.

Gold Rate
19 April 2025
Gold 24 KT 95,800 /-
Gold 22 KT 89,100 /-
Silver / Kg - 96,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याप्रसंगी भाजपा नाग पुर जिल्हा महामंत्री अविनाश खडतकर ,कन्हानचे माजी नगराध्यक्ष शंकर चहांदे, माजी नप उपाध्यक्ष डाॅ मनोहर पाठक, भाजपा तालुका अध्यक्ष अतुल हजारे, रिंकेश चवरे, शैलेश शेळके, कामेश्वर श र्मा, शहर महामंत्री सुनील लाडेकर, न प विरोधी पक्ष गटनेता राजेंन्द्र शेंदरे, नगरसे विका संगीता खोब्रागडे, सुषमा चोपकर, वर्षा लोंढे, वंदना कुरडकर,स्वाती पाठक, लक्ष्मीताई लाडेकर, अजय लोंढे, मनोज कुरडकर, सौरभ पोटभरे, ऋृषभ बावन कर,मयुर माटे, दिपनकर गजभिए,राजेश पोटभरे आदी भाजपा पदाधिकारी, कार्य कर्ता व नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement