नागपूर : देशाचे लक्ष असेलल्या लोकसभा निवडणुकीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यातही विदर्भातील सर्वात प्रतिष्ठेचा मतदारसंघांमध्ये समावेश असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते आणि विद्यामन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यात थेट लढतील गडकारींनी विजय माळ आपल्या गळ्यात घातली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातील पहिल्या फेरी पासून नितीन गडकरी आघाडीवर होते. तर अखेरच्या फेरीत नितीन गडकारींनी 1.25 लाख मतांनी आघाडी मिळवत विजय मिळवला आहे.
विदर्भ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मनाला जात होता .नागपूरमध्ये 1996 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रथमच आपले खाते उघडले. भाजपचे बनवारीलाल पुरोहित खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1998 ते 2004 पर्यंत ही जागा पुन्हा एकदा काँग्रेसच्या ताब्यात गेली आणि विलास मुत्तेमवार सलग चार वेळा खासदार झाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नितीन गडकरी यांना येथून उमेदवारी दिली.
नागपूर हा नितीन गडकरी यांचा गृह जिल्हा आहे. गडकरींनी काँग्रेसचे दिग्गज नेते विलास मुत्तेमवार यांचा 2,84,828 मतांनी पराभव केला. गडकरींना 5,87,767 मते मिळाली. 2019 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा नितीन गडकरी काँग्रेसचे उमेदवार नानाभाई फाल्गुन राव पाटोळे यांचा पराभव करून विजय मिळवले.