Advertisement
नागपूर : मनपा काँट्रेक्टर असोसिएशनच्या वतीने नवनियुक्त आयुक्त श्री राधाकृष्णन बी यांचा स्वागत अध्यक्ष श्री विजय नायडू यांनी पुष्पगुच्छ देऊन बुधवारी केला.
श्री नायडू यांनी आयुक्तांना ठेकेदारांचे बिलांचे भुगतान शीघ्र करण्याची विनंती केली. त्यांनी सांगितले की मनपामध्ये पूर्णकालिक लेखा व वित्त अधिकारी ची लवकर नियुक्ती करण्यात यावी.
आयुक्तांनी त्यांचे म्हणने शांतपणे एकून घेतले आणि नियमानुसार योग्य निर्णय घेण्याचा आश्वासन दिला. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश पोटपोसे, सुनील शर्मा, जितू गोपलानी, आफताब अहमद, शेख अजीज, नजीम भाई, राजा व बब्लू भाई उपस्थित होते.