नागपूर: अमर शहीद कंवरराम यांच्या जयंती निमित्त गांधीबाग उद्यान सी.ए.रोड स्थित कंवरराम यांच्या पुतळयाला उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलींद माने, उपमहापौर दिपराज पार्डीकर, अध्यक्ष स्थायी समिती सभापती विरेन्द्र कुकरेजा, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती महेन्द्र धनविजय, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, नगरसेवक ॲड. संजय बालपांडे, नगरसेविका विद्या कन्हेरे, नगरसेविका सरला नायक, नगरसेविका सुषमा चौधरी, प्रमीला मथरानी यांनी म.न.पा.तर्फे पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी माजी नगरसेवक सुरेश जग्यासी, डॉ.विंकी रुगवानी, अशोक केवलरमानी व सिंधी समुदायाचे बहुसंख्य मान्यवर नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिनांक १४ एप्रिल २०१८ रोजी
भारत रत्न प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त म.न.पा.तर्फे मा.महापौर नंदाताई जिचकार, उपमहापौर दिपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती विरेन्द्र कुकरेजा, सत्तापक्ष नेता संदीप जोशी, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, मा.आयुक्त अश्वीन मुदगल हे सकाळी ९.०० वाजता संविधान चौक स्थित प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र् अभिवादन करतील. तसेच 9.10 वाजता म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील मुख्य दालनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करतील.