नागपूर: महापालिकेच्या कचरावाहू भरधाव वाहनाने महिलेला चीरडल्याची माहिती आहे.सीमा किशोर चौधरी (वय 38 वर्षे, सुरेंद्रगड गौलीपुरा) असे मृत महिलेचे नाव असून हा भीषण अपघात प्रेरणा नगर अफजल बकरी जवळ घडला.
माहितीनूसार,महानगरपालिकेच्या कचरावाहू वाहनाने (MH.31 – FC 7135) रस्त्यावरून जाणाऱ्या सीमा किशोर चौधरी यांना धडक दिली. या भीषण धडकेत चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. स्थानिक लोकांनी मृत सीमा चौधरीच्या कुटुंबीयांना या घटनेसंदर्भात कळवले. तसेच सीमा हिला उपचारासाठी मेवा हॉस्पिटलमध्ये दाखल केले.डॉक्टरांनी उपचारादरम्यान तिला मृत घोषित केले.
सामाजिक कार्यकर्ते रिजवान रुमवी यांनी घटनेची माहिती स्थानिक आमदार विकास ठाकरेसह मनपा, धरमपेठ पोलिसांसह झोनचे आरोग्य विभागीय अधिकारी दीनदयाल टेंबेकर यांना दिली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.