Published On : Thu, Jun 25th, 2020

#पारडी १, पारडी २ व भांडेवाडी जलकुंभांचा पाणीपुरवठा सोमवार १५ जून रोजी राहणार बाधित

Advertisement

नागपूर: ७००मिमी व्यासाच्या पारडी फीडर मेनवर पारडी जलकुंभ परिसरात मोठी गळती आढळून आलेली आहे. मनपा-OCWने दुरुस्तीचे काम सोमवार १५ जून २०२० रोजी हाती घेण्याचे ठरविले आहे.

गळती दुरुस्तीसाठी मनपा-OCW यांनी पारडी १, पारडी २ व भांडेवाडी जलकुंभांसाठी १२ तासांचे शटडाऊन घोषित केले आहे. हे शटडाऊन सोमवार सकाळी १० ते रात्री १० दरम्यान घेण्यात येईल.

Gold Rate
Friday 17 Jan. 2025
Gold 24 KT 79,500 /-
Gold 22 KT 73,900 /-
Silver / Kg 91,400 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:
पारडी १ जलकुंभ: विनोबा भावे नगर, महाजनपुरा, तेलीपुरा, खाटिकपुरा, बुद्धपुरा, उपरे मोहल्ला, सराई मोहल्ला, गोंडपुरा, कोष्टीपुरा, देवळेवाडी, उडियापुरा, ठवकरवाडी, सद्गुरू नगर, गिरी नगर, गांधी कुटी, शेंडे नगर, अंबे नगर, सुविकास सोसायटी, सुंदर नगर, धनलक्ष्मी सोसायटी

पारडी २ जलकुंभ: अशोक नगर, तालपुरा, झांसी राणी चौक, बालाजी नगर, मोहकरवाडी, दत्तचौक, गंगाबाग, शारदा नगर, मानकरवाडी, पॉप्युलर सोसायटी, गणेश मंदिर परिसर, सुविकास सोसायटी, मराठा चौक, राम मंदिर, घटाटे नगर, शनि मंदिर, कैलाश चौक, पुनापूर गाव, भरतवाडा, करारे नगर, भोलेश्वर सोसायटी आणि शिव नगर

भांडेवाडी जलकुंभ: राज नगर, बालाजी किराणा, श्रावण नगर, वैष्णोदेवी नगर, विश्वशांती लेआऊट, चांदमारी नगर, पवनशक्ती नगर, धरती मा सोसायटी, मेहेर नगर, साहिल नगर, सरजू टाऊनशिप, खांद्वानी टाऊनशिप, अन्तुजी नगर, अबू मियां नगर, महेश नगर, सुरज नगरचा काही भाग

यासोबतच भांडेवाडी जलकुंभावरून चालणारे नेटवर्क व नॉननेटवर्क टँकर देखील या दरम्यान बंद राहतील. यामुळे बाधित भागांतील नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन मनपा-OCW ने केले आहे.

For more information about water supply consumers can contact OCW on 1800 266 9899.

Advertisement