नागपूर, – नागपूर महानगरपालिका (NMC) आणि ऑरेंज सिटी वॉटर (OCW) यांनी नागपूरच्या नागरिकांसाठी पाणीपुरवठा सेवा अधिक सोयीस्कर करण्यासाठी ‘नागपूर जल ग्राहक सेवा’ हे नवे मोबाईल अॅप लाँच केले आहे. हे अॅप नागपूर वॉटर अॅपची सुधारित आवृत्ती असून, प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने जलसेवांचा अधिक सहज आणि कार्यक्षम अनुभव प्रदान करते.
या अॅपच्या मदतीने वापरकर्ते आपले पाणीदेयक ऑनलाइन बघू शकतात व भरू शकतात व पाणीपुरवठ्याविषयक तक्रारीदेखील करू शकतात. लवकरच याच अॅपद्वारे नागरिक नळजोडणीसाठी किंवा नाव-बदल, नळजोडणीच्या आकारात बदल इत्यादीसाठी अर्जदेखील करू शकतील. यापूर्वी ग्राहकांना या सर्व सेवांसाठी झोन कार्यालयांना भेट द्यावी लागत असे. मात्र, आता या सर्व सोयी एकाच क्लिकवर उपलब्ध आहेत.
ग्राहक आता तक्रारी नोंदवू शकतात आणि त्यांचे ऑनलाईन ट्रॅकिंग करू शकतात. याशिवाय, एका “हॅपी कोड (OTP)” पडताळणीद्वारे तक्रारींचे निराकरण निश्चित केली जाईल. बिलिंग आणि पेमेंट प्रक्रियाही अधिक सोपी झाली आहे, जिथे वापरकर्ते PDF स्वरूपात बील पाहू शकतात, पेमेंट इतिहास तपासू शकतात आणि नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड, UPI आणि वॉलेट्सद्वारे सोयीस्करपणे पेमेंट करू शकतात.
हे अॅप रिअल-टाइम नोटिफिकेशन्स प्रदान करते, ग्राहकांना बिलिंग, सेवा सुधारणा आणि इतर महत्त्वाच्या पुश नोटिफिकेशन्स व SMS अलर्ट्सद्वारे सूचित ठेवते.
याशिवाय, अॅपमध्ये संपर्क व्यवस्थापन सुधारणा करण्यात आली असून, ग्राहकांना त्यांचे मोबाइल क्रमांक आणि इतर संपर्क माहिती सहज अपडेट करता येईल.
ही नवीन सुविधा नागपूर महानगरपालिका-OCW च्या पारदर्शकता, कार्यक्षमता आणि ग्राहक सोयीसाठीच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. नागपूरकरांनी हे अॅप डाउनलोड करून अधिक सुलभ जलसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी NMC-OCW हेल्पलाइन 1800 266 9899 वर संपर्क साधा किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करा.