बस्तरवारी जलकुंभ स्वच्छता १० नोव्हेंबर रोजी
नागपूर : नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत दरवर्षीप्रमाणे यंदाही जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत सतरंजी पुरा झोन मधील बस्तर वारी जलकुंभ नोव्हेंबर १० (बुधवार) रोजी स्वच्छ करण्यात येणार आहे .
मनपा-OCW दरवर्षीच नागपुरातील सर्व जलकुंभ वर्षातून एकदा स्वच्छता करीत असते. हि परंपरा मनपा-OCW ने २०२१ पासून नित्यनियमाने सुरु केलेली आहे.
सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील.
पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: जोशिपुरा , सोनार टोळी, जय भोले नगर, आनंद नगर, जोसाबी घात, बिनाकी मंगळवारी, मेहंदी बाग कॉलोनी , जामदार वाडी , वृंदावन नगर, पोळा मैदान , कोलबास्वामी नगर, इंदिरा गांधी नगर, नामदेव नगर, पाठ राबे वाडी , कांजी हाउसे चौक , कुंदनलाल गुप्त नगर , बोहरा कब्रस्तान .
शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
NMC-OCW have appealed citizens to co-operate and if they have any complaints regarding water supply or need information please do contact @ NMC-OCW’s Toll Free Number 1800 266 9899 at any time.