नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी शनिवार ९ सप्टेंबर रोजी टाकळी सीम फीडर लाईनवरील सुमित नगर, मंगलमूर्ती चौक व आणखी एका ठिकाणी अशा २ मोठ्या गळत्या दुरुस्त करण्याचे ठरवले आहे.
या दोन्ही दुरुस्त्यांच्या कामामुळे त्रिमूर्ती नगर, टाकळी सीम व जयताळा जलकुंभ यांचा पाणीपुरवठा शनिवारी बाधित राहील.
पाणीपुरवठा बाधित राहणारे जलकुंभ/भाग:
टाकळी सीम जलकुंभ:- हिंगणा रोड, राजेंद्र नगर, कल्याण नगर, यशोदा नगर, वासुदेव नगर, लुंबिनी नगर, गाडगे नगर, गुडलक सोसायटी, म्हाडा कॉलोनी, सुर्वे नगर, आदर्श नगर, सौदामिनी सोसायटी, प्रगती नगर, शहाणे लेआऊट, बाघानी लेआऊट, त्रिमूर्ती नगर, सुभाष नगर, अध्यापक लेआऊट, LIG, MIG व HIG कॉलोनी,त्रिशरण नगर, अहिल्या नगर, हिरनवार लेआऊट, प्रसाद नगर, जलविहार कॉलोनी, मंगलधाम सोसायटी, जलतरंग, नेल्को सोसायटी, NIT भाग्यश्री लेआऊट, झाडे लेआऊट, अष्टविनायक नगर, कोस्मोस टाऊन, राधेश्याम नगर, संघर्ष नगर.
त्रिमूर्ती नगर जलकुंभ: – भेंडे लेआऊट, सोनेगाव, लोकसेवा नगर, इंद्रप्रस्थ नगर, अमर आशा लेआऊट, पन्नासे लेआऊट, HB इस्टेट, ममता सोसायटी, स्वागत सोसायटी, पराते नगर, समर्थ नगरी, सहकार नगर, गजानन धाम, मनीष लेआऊट.
जयताळा जलकुंभ:- संपूर्ण जयताळा भाग, रमाबाई आंबेडकर नगर, दाते लेआऊट व सभोवतालचा भाग.
मनपा-OCW ने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले.