प्लाजमा दानासाठी कार्य करणार
नागपूर: रक्तदान हे जसे श्रेष्ठदान समजले जाते, तसेच कोविड संक्रमणाच्या काळात प्लाजमा दान हेही तेवढेच महत्त्वाचे असल्याचे अनुभवाला आले आहे. या क्षेत्रात अधिक कार्य करून लोकांना प्लाजमा दानासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेतून रक्त संवेदना हा समूह तयार झाला आणि कार्यरतही झाला आहे.
रक्तदानाप्रमाणे प्लाजमा दानही आपण करू शकतो. कोविड रुग्णांना प्लाजमा मिळाल्यामुळे अनेकांचा जीव वाचला आहे. प्लाजमा दानाचे महत्त्व अधिक असले तरी माहितीअभावी अनेकजण अजूनही प्लाजमा दानासाठी पुढे येत नाहीत. यासाठी रक्त संवेदना समूह समाजात प्लाजमा दान कसे महत्त्वाचे आहे, याचा प्रचार करणार आहे.
या समूहात सागर कोतवालीवाले, गजानन रानडे, श्रीहरी जोगळेकर, वैभव बेडेकर, आशुतोष अडोणी, शंतनू हरिदास, अभिजित बोरीकर, मुकुल मुळे आदी सदस्य आहेत. या सर्वांना ना. नितीन गडकरी, डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे सचिव अशोक पत्की तसेच डॉ. किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
हा समूह कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांशी संपर्क करून त्यांना प्लाजमा दान करण्यासाठी जनजागृती करेन. अधिक माहितीसाठी गजानन रानडे-9822943870, हरिश जोगळेकर-9730034030. या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.