नागपूर: शासकीय ग्रामीण रुग्णालयांची गरज लक्षात घेता आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तीन तालुक्यातील ग्रामीण रुग्णांलयांना सर्व सुविधांनी युक्त अॅम्ब्युलन्सचे वितरण करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय कुही, देवलापार आणि मौदा या तीन रुग्णालयांच्या अधिकार्यांकडे या अॅम्ब्युलन्सच्या चाव्या ना. गडकरी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या.
आ. गिरीश व्यास यांच्या आमदार निधीतून टाटाच्या 3 अॅम्ब्युलन्स घेण्यात आल्या व त्याचे आज वितरण करण्यात आले. यामुळे तीनही तालुक्यातील रुग्णांची सोय झाली आहे.
हा कार्यक्रम ना. गडकरी यांच्या निवासस्थानी झाला असून यावेळी आ. गिरीश व्यास, आ. विकास कुंभारे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. प्रवीण दटके, आ. टेकचंद सावरकर, माजी आ. सुधीर पारवे, भाजपा जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, माजी आ. मल्लिकार्जुन रेड्डी, विकास तोतडे, महामंत्री अजय बोढारे व अविनाश खळतकर, प्रकाश वांढे, प्रकाश टेकाडे, संजय भेंडे, रमेश मानकर, शिवाजी सोनटक्के, किशोर पाटील आदी उपस्थित होते.