Advertisement
नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच श्री पंडितकाका धनागरे महाराज यांचे उत्तराधिकारी व धर्मभूषण श्री दत्तसंप्रदायवर्धक प. पू. श्री विजूकाका पोफळी महाराज यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्री पंडितकाका यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.
दोन दिवसांपूर्वीच श्री. धर्मभूषण श्री दत्तसंप्रदायवर्धक प. पू. श्री विजूकाका पोफळी महाराज लिखित ‘तपोनिधी’ या पंडितकाकांच्या जीवनावरील चरित्रग्रंथाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. श्री. मोहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमालाही ना. गडकरी उपस्थित होते.