Published On : Fri, May 4th, 2018

यापुढे कोणालाही भाऊ मानणार नाही – पंकजा मुंडे

Advertisement

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसने पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ रमेश कराड यांना आपल्या जाळ्यात अडकवले असून विधानपरिषदेच्या जागेसाठी उमेदवारी दिली आहे. रमेश कराड हे पंकजा मुंडे यांच्या अत्यंत जवळच्या माणसांपैकी एक होते. पंकजा मुंडे या रमेश कराड यांना आपल्या भावासारखं मानायच्या. सतत ११ वर्षे ते पंकजांसोबत होते. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याने पंकजा यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. काल कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला.

दरम्यान रमेश कराड यांनी पक्षाशी नातं तोडलं आहे, आपल्याला सोडलेलं नाही. भविष्यात आता यापुढे कोणाला भाऊ मानणार नाही, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या उस्मानाबादमध्ये सुरेश धस यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होत्या. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार प्रहार केला.

Gold Rate
21 April 2025
Gold 24 KT 96,700 /-
Gold 22 KT 89,900 /-
Silver / Kg 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी त्या म्हणाल्या की, “रमेश कराड यांनी भाजपा सोडल्यामुळे आपल्याला मोठा धक्का बसला अशा भ्रमात जे आहेत, त्यांनाच धस यांच्या उमेदवारीमुळे धक्का बसला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांस आव्हान देणारे धस यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला डावलल्यामुळे राष्ट्रवादीला त्याचा फटका बसणार आहे. कराड यांनी पक्ष सोडला आहे, आपल्याला सोडलेलं नाही. भविष्यात आता कोणाला भाऊ मानणार नाही”, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

“राष्ट्रवादी पक्ष पूर्वीसारखा प्रामाणिक राहिलेला नाही. आता पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा अजित पवार पक्ष चालवत नसून, तोडपाणी करणार्‍या दलालांच्या हातात पक्षाची धुरा गेली आहेत”, अशा शब्दात माजी मंत्री सुरेश धस यांनी आमदार धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. “गोपीनाथ मुंडे यांच्यासमोर उभे राहण्याची राष्ट्रवादीमध्ये कुणाची लायकी नव्हती. त्यावेळी आपण त्यांच्याविरोधात निवडणूक लढवली. परभणीत बाबाजानी दुर्राणी यांचा बळी दिला गेला, तर उस्मानाबादेत अशोक जगदाळे यांना उमेदवार म्हणून नुसतेच फिरवले. रमेश कराड यांना उमेदवारी देण्याचा नक्की निकष काय?”, असा सवालही धस यांनी यावेळी उपस्थित केला.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत भाजपातर्फे सुरेश धस यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उमेदवारी सुरेश धस, आमदार सुजितसिंह ठाकूर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, जिल्हाध्यक्ष नितीन काळे आदींची उपस्थिती होती.

Advertisement
Advertisement