मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चप्पलांनी मारल्याच्या वक्तव्याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, मला ठाकरेंपासून शिष्टाचार शिकण्याची गरज नाही. माझ्यात ठाकरेंपेक्षा जास्त शिष्टाचार असल्याचे योगी म्हणाले. वृत्त संस्थेनुसार मुख्यमंत्री म्हणाले, त्यांना खरे माहित नाही. श्रद्धांजली कशी द्यावी लागते याची जाणीव त्यांच्यापेक्षा मला जास्त आहे. त्यांनी मला शिकवू नये.
वस्तुत: गेल्या काही काळापासून भाजपा आणि शिवसेनेदरम्यान तनावाची स्थिती आहे. दोन्ही पक्ष जरी सत्तेत एकत्र असले तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून ऐकमेकांवर केले जाणारे हल्ले कमी होताना दिसत नाही. त्यांनी म्हटले होते कि, योगींना चप्पलांनी मारले पाहिजे. ठाकरे यांचे म्हणणे होते कि छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर माल्यार्पण करताना योगी आदित्यनाथ यांनी खडाऊ काढले नाही. असे केल्याने योगींनी शिवाजींचा अपमान केला आहे. असे म्हणताना ठाकरे यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.