Advertisement
नागपूर: नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी अभिनंदन केले आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने मेहनत घेतली. आणि उज्ज्वल यश मिळविले. हे सर्व विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात जाऊन त्या क्षेत्रात नागपूरचे आणि आपल्या देशाचे नाव उंचावतील.
पुढील शिक्षणासाठी आणखी जास्त मेहनत घेऊन अधिकाधिक यश मिळविण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेऊन भविष्यात विविध क्षेत्रात उज्ज्वल यश मिळवावे, अशा शुभेच्छाही ना. गडकरी यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.