नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्न निकेतन’ या प्रकल्पाचे रविवारी (ता.१९) केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत भूमिपूजन झाले.
कामठी रोडवरील पिवळी नदी जवळ मौजा वांजरा येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्न निकेतन’ या प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार कृष्णा खोपडे, मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी महापौर श्री संदीप जोशी, संदीप डेव्हलपर्सचे श्री गौरव अग्रवाल, उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे, मुख्य अभियंता श्री. दिनेश नंदनवार, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता सुनील उईके आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी व उप मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत केले. संदीप डेव्हलपर्सचे श्री गौरव अग्रवाल यांनीही दोन्ही मान्यवरांचे स्वागत केले.
प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे (शहरी) प्रकल्पाची वैशिष्ट्ये
घटक ३ (AHP) अंतर्गत ४८० EWS सदनिकांच्या DPR ला दि. ३०/०३/२०२२ रोजी केंद्र शासनाची मंजुरी प्राप्त असुन, सदर प्रकल्प मौजा वांजरा ख.क्रं. २४/४ व २४/६. CTS No २९ व ३० चे एकूण १४१६०.४० चौ.मी. क्षेत्रफळाचे जागेवर प्रस्तावित आहे.
• सदर प्रकल्पात वाहनतळासह तळमजला + ७ मजल्याच्या ८ इमारतीचे बांधकाम पायाभूत सुविधेसह समाविष्ट आहे. मंजूर प्रकल्प किंम्मत रु. ५६८४.२९ लक्ष इतकी आहे.
• सदर प्रकल्पास राज्य व केंद्र शासनाकडून रु. १२००.०० लक्ष चा अनुदान प्राप्त होणार आहे.
• EWS घटकातील नागरीकांना अंदाजे रु. ९.०२ लक्ष पर्यंत प्रति सदनिका उपलब्ध होईल.
• सदर प्रकल्प खाजगी सार्वजनिक भागीदारी (PPP) तत्वावर राबविण्यात येत आहे.
• सदर कामाचे कार्यारंभ आदेश संदीप डेव्हलपर्स प्रा. लि. यांना देण्यात आला असून प्रकल्प माहे डिसेंबर, २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे.