Advertisement
मुंबई : काँग्रेस असो की अन्य विरोधी पक्ष कोणत्याच पक्षात भाजपशी लढण्याची ताकद नाही, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ते आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही. हे पक्ष असे अराजकवादी गट बनले आहेत, जे केवळ नकारात्मक आणि फूट पाडण्याचे काम करतात.
यादरम्यान बेकायदा बांधकामांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत मांडले.
ते म्हणाले की, महाराष्ट्रात बेकायदा बांधकाम करून माणसे गोळा करून कायद्याचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते बांधकाम नक्कीच मोडीत काढले जाईल.