नागपूर: राजभवन येथील जलवाहिनीवरील गळती दुरुस्ती तसेच राजभवन ते बोरियापुरा मुख्य जलवाहिनीवर फ्लो मिटर बसविण्याची कामे उद्या २९ मार्च सकाळी १० ते ३० मार्च सकाळी दहापर्यंत केली जाणार आहे.
त्यामुळे गोरेवाडा पेंच एक जलशुद्धीकरण केंद्र २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी, पाच झोनमधील काही भागांमध्ये उद्या मंगळवार तसेच बुधवारी पाणीपुरवठा होणार नाही.
जलशुद्धीकरण केंद्रच २४ तास बंद राहणार असल्याने मंगळवारी झोनमधील राजभवन-सदर, राजभवन-राजनगर, गोधनी-गोरेवाडा तसेच धंतोली झोनमधील रेशीमबाग जलकुंभ, हनुमाननगर जलकुंभ, वंजारीनगर जलकुंभ, वंजारीनगर (नवीन) जलकुंभांतर्गत वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.
याशिवाय गांधीबाग झोनमधील सीताबर्डी किल्ला जलकुंभ, सतरंजीपुरा झोनमधील बस्तरवाडी जलकुंभ, बोरियापुरा मुख्य जलवाहिनी, वाहन ठिकाना जलकुंभ, बोरियापुरा जलकुंभ तसेच धरमपेठ झोनमधील राजभवन-सीताबर्डी मुख्यजलवाहिनी परिसरांतर्गत येणाऱ्या वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा बाधित राहणार आहे.