नागपूर : लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांची उमेदवारी अद्यापही घोषित करण्यात आली नाही.
भावना गवळी यांची उमेदवारी तात्काळ घोषित करावी अन्यथा पदाधिकारी, कार्यकर्ते थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामूहिक राजीनामे देऊ,असा इशारा त्यांच्या समर्थकांनी दिला.
शिवसेना वाशिम जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचलले आहे. वाशिममध्ये शिवसैनिकांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भावना गवळी यांना आजच उमेदवारी देण्याची मागणी करतानाच तसं न झाल्यास राजीनामे देणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
दरम्यान भावना गवळी यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध केला जात आहे. त्यांच्या जागेवर संजय राठोड यांना उमेदवारी देण्याची चर्चा केली जात आहे.