कामठी:-महिला , तरुणी, विद्यार्थिनींना भयमुक्त वातावरणात जगता यावे तसेच त्यांच्यावर आलेल्या संकट समयी त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी कामठी पोलीस विभागाच्या वतीने पोलीस काका,पोलीस दीदी हा उपक्रम राबविणे सुरू केले आहे.याबाबत कामठी शहर पोलिसानी संकटासमयी पोलिसांना हाक द्या असे आव्हान केले आहे.
कामठी शहर हे नागपूर जिल्ह्याचे उपनगर असून तालुका दर्जाप्राप्त आहे .या शहरात मुख्य शासकीय कार्यालयासह नामवंत शाळा महाविद्यालये असल्याने बाहेर गावाहून अनेक विद्यार्थिनी येतात तसेच महिलांची वावर शहरात मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे या महिलांच्याअ सुरक्षिततेसाठी कामठी शहर पोलिसानी पोलीस काका,पोलीस दीदी हा उपक्रम सुरू केला आहे.महिला विद्यार्थिनींना पाहून टांटिंग करणे, त्यांची टिंगल टवाळी करणे, लज्जास्पद वर्तन करणे असे प्रकार अनेकवेळा रोड रोमियो कडून केल्या जातात अशा रोडरोमियांना जबर बसावी व शहरात भयमुक्त वातावरण निर्माण व्हावे यासाठी हा उपक्रम अत्यंत फलदायी ठरणारा आहे यानुसार शहरातीक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला पोलीस दीदी म्हणून महिला पोलीस कर्मचारी मंगला बोबडे, तर पोलीस काका म्हणून पोलीस कर्मचारी समाधान पांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच नवीन कामठी पोलीस स्टेशन ला पोलीस दीदी म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक शितल चामले , माया अमृ, सुजाता कुर्वे, आमरीन बी, मनीषा माहुरे, आरती जुंनघरे तसेच पोलीस काका म्हणून मयूर बन्सोड, संदीप ताजने, निलेश यादव, कनोजिया, महेश नाईक आदींचा समावेश करण्यात आला आहे यासाठी महिलांनी तरुणींनी विद्यार्थिनींनी संकटासमयी उपरोक्त नेमून दिलेल्या पोलीस दीदी तसेच पोलीस काकांशी संपर्क साधून सरळ तक्रार करता येईल . तसेच तक्रारकर्त्यांचे नाव हे गुपित ठेवले जाईल अशी माहिती संबंधित पोलीस दीदी व पोलीस काकांनी दिली
संदीप कांबळे कामठी