नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील कराटे स्पर्धेमध्ये एनएसकेएआय संघाने स्पर्धेत सर्वाधिक गुणांसह वर्चस्व सिद्ध केले आहे. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे ही स्पर्धा सुरु आहे. गुरुवारी विविध वयोगटातील मुलींचे सामने घेण्यात आले.
स्पर्धेत सर्वाधिक ७२ गुणांसह एनएसकेएआय संघाने आघाडी घेतली आहे. मुलींच्या गटात एनएसकेएआय संघाने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी १४ सुवर्ण, ११ रौप्य आणि ८ सुवर्ण पदकांची कमाई करुन अग्रस्थान प्राप्त केले. एकूण १९ गुणांसह एटीकेएएन संघाने दुसरे स्थान पटकाविले. एटीकेएएन ने ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदक प्राप्त केले. १८ गुणांसह मित्सुया-काई-हयाशी-हा-शितो-रियू कराटे-दो-इंडिया संघाने तिसरे स्थान प्राप्त केले. संघाने ३ सुवर्ण, १ रौप्य आणि ७ कांस्य पदक पटकाविण्याची कामगिरी केली.
मुलींचे सामने
निकाल (सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक):
१२ वर्ष – ३६ किलोवरील वजनगट : ओजल मुनेश्वर (एनएसकेएआय), केया बाहे (एनएसकेएआय), तन्वी बोपचे (एमएसके मटेरियल आर्ट ॲकेडमी)
१० वर्ष – ३२ किलोवरील वजनगट : पहेल दाबडे (एनएसकेएआय), अलीना शेखा (एनएसकेएआय), हर्षित नंदनवार (डीएसए ॲकेडमी)
१० वर्ष – १६ किलोखालील वजनगट : सांज मस्करे (गेन्सेयरीयू कराटे दो नागपूर), राजीव डोमकुंडवार (कराटे दो शोतोकान स्पोर्ट्स असोसिएशन इंडिया), काव्या मोरे (डीएसए ॲकेडमी)
१२ वर्ष – २४ किलोखालील वजनगट : शन्यू रामटेके (महाराष्ट्र स्पोर्ट्स कराटे ॲकेडमी ऑफ नागपूर), मनस्वी पराते (अरेना स्पोर्ट्स यूनिव्हर्स ॲकेडमी), श्रावणी हिंगे (मटेरियल आर्ट्स ट्रेनिंग असोसिएशन)
१४ वर्ष – ३८ ते ४० किलो वजनगट : क्षितीजा मदनकर (एनएसकेएआय), प्रिया दुपारे (एटीकेएएन), रहमीन अहमद (मित्सुया-काई-हयाशी-हा-शितो-रियू कराटे-दो-इंडिया)
१४ वर्ष – ४० ते ४२ किलो वजनगट : सिद्धी इंगोले (एनएसकेएआय), नेहा प्रजापती (एनएसकेएआय), वैष्णवी कटरे (एटीकेएएन)