नागपुरात कोरोनाच्या निदानासाठी आतापर्यंत केवळ 1 PCR मशीन उपलब्ध होती. राज्यसभेचे खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे यांच्या प्रयत्नातून ही संख्या 13 पर्यंत जाईल.
गेल्या वर्षी डॉ. महात्मे यांनी नागपुरातील MAFSU येथे ONE HEALTH CENTRE सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला व मा. नितीन जी गडकरींच्या मदतीने ते सुरू झाले. तेथे 2 PCR मशीन आहेत जी कार्यरत स्थितीत आहेत.
याशिवाय Animal Husbandry Department अंतर्गत Livestock development board कडे 10 PCR मशीन्स असल्याची माहिती मिळाली आहे.
जर ही मशीन्स कार्यरत स्थितीत असतील तर नागपूर मधे कोरोना टेस्टची क्षमता 1 मशीनपासून 13 पर्यंत वाढू शकेल जी खरोखर मोठी उपलब्धी असेल. केवळ विचारांची दिशा बदलली तर जग बदलून शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे.