Advertisement
संस्थेच्या कार्यकाळाला मुदतवाढ द्यावी
नागपुर – नागपूर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये प्रस्ताव पारित करण्यात आला की, इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षण माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या होणाऱ्या निवडणुकांना महाराष्ट्र शासनाद्वारे तातडीने स्थगिती द्यावी तसेच अस्तित्वात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संपुष्टात येणाऱ्या कार्यकाळाला यथायोग्य मुदतवाढ देण्यात यावी.
असा सभागृहातील सदस्यांचा मानस आहे.
या ठरवास सभागृहाने मंजुरी प्रदान करावी.