पूर्व नागपुर भाज.प.चे लालगंज, झाडे चौक येथे ओ.बी.सी.आरक्षणासाठी जनाक्रोश आंदोलन
नागपूर : पूर्व नागपुरात आमदार कृष्णा खोपडे यांचे मार्गदर्शनाखाली भा.ज.प.च्या वतीने ओ.बी.सी.च्या राजकीय आरक्षणासाठी राज्य शासनाचे विरुद्ध जनाक्रोश आंदोलन सुरु केले असून सुरुवात लालगंज, झाडे चौक येथून झाली. यावेळी भा.ज.पा. युवा मोर्चाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार व बाळासाहेब थोरात यांचे पुतळे जाळून या तिघाडी सरकारचा जाहीर निषेध केला.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, ओ.बी.सी.चे राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे, ही या तिघाडी सरकारची मुळातच इच्छा नाही. कोर्टाने राज्य सरकारला ओ.बी.सी. आरक्षण टिकविण्यासाठी आयोग गठीत करण्याचे निर्देश दिले. सरकारने आयोग गठीत केले खरे, मात्र आयोगासाठी स्टॉफ व लागणारा निधी या राज्य सरकारने उपलब्ध करून न दिल्यामुळे आयोगाचे कामकाज त्या पद्धतीने होऊ शकले नाही. आणि जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या ओ.बी.सी. जनप्रतिनिधीचा राजकीय बळी घेण्याचे काम उद्धव ठाकरेच्या नेतृत्वात या तिघाडी सरकारने केले आहे. ओ.बी.सी. मताच्या भरवशावर आलेल्या या सरकारने ओ.बी.सी. सोबत अन्याय करण्याचे पाप केले आहे. ओ.बी.सी. शिवाय निवडणूक घेण्याचा या ठाकरे सरकारचा डाव असल्याचा आरोप संजय भेंडे यांनी केला.
शहर भा.ज.प.चे महामंत्री नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी ओ.बी.सी. आरक्षणासाठी वेळ आली तर राजीनामा देईल, असे वक्तव्य करणा-या छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांच्यावर घणाघात करीत या मंत्र्यांना लाज वाटत असेल तर तात्काळ राजीनामा देऊन आंदोलनात सहभागी व्हावे. अन्यथा ओ.बी.सी. जनता तुम्हाला स्वत: खुर्चीवरून खेचल्याशिवाय राहणार नाही. मराठा व ओ.बी.सी.च्या आरक्षणाचा बली घेणा-या या सरकारला आता सत्तेवर राहण्याच्या नैतिक अधिकार नसल्याचे सुद्धा ते यावेळी म्हणाले.
आंदोलनात प्रामुख्याने प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, संजय अवचट, बाल्या बोरकर, अॅड.धर्मपाल मेश्राम, प्रमोद पेंडके, मनिषा धावडे, महेंद्र राऊत, सन्नी राऊत, राजू गोतमारे, निशा भोयर, राजकुमार सेलोकर, अभिरुची राजगिरे, संजय महाजन, मनोज चापले, प्रदीप पोहाणे, मनिषा कोठे, सरिता कावरे, हरीश दिकोंडवार, अनिल गेंडरे, दिपक वाडीभस्मे, वैशाली वैद्य, सचिन करारे, चंदन गोस्वामी, विनोद बांगडे, मनोहर चिकटे, श्रीकांत सायरे, गणेश पौनीकर, घनश्याम ढाले, सागर मोहिते, गुड्डू पांडे, प्रशांत सोनारघरे, राजेश ठाकूर, अतुल खोब्रागडे, किशोर दुधे, सुनिल सूर्यवंशी, सुधीर दुबे, ओंकारेश्वर गुरव, राजकमल नागरे, बाळा वानखेडे, मंगेश धार्मिक, शेख एजाज, शैलेश नेताम, राहुल यादव, विवेक ठवकर तथा अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकगण प्रामुख्याने उपस्थित होते.