Published On : Mon, Dec 20th, 2021
By Nagpur Today Nagpur News

आशी नगर झोन: ३ जलकुंभाची स्वच्छता डिसेंबर २२ते २४ दरम्यान

Advertisement

मनपा-OCW वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहीम.

नागपूर : नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धता अनुसरत दरवर्षीप्रमाणे यंदाही जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. मनपा-OCW दरवर्षीच नागपुरातील सर्व जलकुंभ वर्षातून एकदा स्वच्छता करीत असते. हि परंपरा मनपा-OCW ने २०१२ पासून नित्यनियमाने सुरु केलेली आहे.

आशी नगर झोन अंतर्गत बिनाकी जलकुंभ : डिसेंबर २२ (बुधवार), बिनाकी-१ जलकुंभ : डिसेंबर २३ (गुरुवार), तसेच बिनाकी -२ जलकुंभ : डिसेंबर २४ (शुक्रवार) रोजी स्वच्छता करण्यात येतील* जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागात पाणीपुरवठा बाधित राहील. ह्या जलकुंभ स्वच्छता शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

२२डिसेंबर (बुधवारी ) रोजी बिनाकी जलकुंभावरून पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:
महर्षी दयानंद नगर, बाबा बुद्ध नगर, पंचशील नगर, सुजाता नगर, फारूक नगर, महेंद्र नगर, बापू पाटील वाडी, पंचकुवा , वैशाली नगर….

२३ डिसेंबर (गुरुवारी) ) रोजी बिनाकी-१ जलकुंभावरून पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:
प्रवेश नगर, संगम नगर, यशोधरा नगर, गरीब नवाझ नगर, शिवशक्ती नगर, पावन नगर, संजीवनी वसाहत

२४ डिसेंबर (शुक्रवारी ) ) रोजी बिनाकी-२ जलकुंभावरून पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:

आनंद नगर, पंचवटी नगर, धमादीप नगर, संजय गांधी नगर, यादव नगर, एकटा नगर, चिमुरकर ले आउट, सुदाम नगर

ह्या जलकुंभ स्वच्छता आणि शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

अधिक माहिती करिता मनपा-OCW टोल फ्री नंबर १८००२६६९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात.

Advertisement