नागपूर: २२ मार्च २०२५ रोजी जागतिक जल दिनानिमित्त, OCW आणि NGO आरोहा यांनी जल संवर्धन आणि पर्यावरणीय शाश्वततेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जल दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन येथे पार पडला, ज्यात NGO अरोहा चे पर्यावरणविद, तसेच संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा आणि जयतला सेकेंडरी शाळेचे मुख्याध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पाणी संवर्धन विषयक सर्जनशील चित्रकला आणि पोस्टर प्रदर्शनाने झाली, ज्यात निवडलेल्या विद्यार्थ्यांना “ग्रीन अंबेसडर” म्हणून टी-शर्ट दिल्या गेल्या. औपचारिक उद्घाटनानंतर, ओसीडब्ल्यू, अरोहा आणि सहभागी शाळांच्या मान्यवरांनी पाणी संवर्धन, शाश्वत पद्धती आणि पर्यावरणीय जबाबदारीबद्दल आपले विचार मांडले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कचरा वर्गीकरणावर आधारित स्ट्रीट प्ले, जैविक शेती, कंपोस्टिंग आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर प्रेरणादायक भाषणे आणि तरुण प्रतिभेने पर्यावरणीय जाणीव विषयक कविता सादरीकरण केले.
कार्यक्रमाचा समारोप पुरस्कार वितरण आणि पाणी संवर्धनासाठी शपथ ग्रहण सोहळ्याने झाला.
OCW आणि NGO अरोहा पर्यावरणीय जाणीव वाढविण्यासाठी प्रभावी उपक्रम राबवित आहेत, तरुण मनांना शाश्वत भविष्यासाठी योगदान देण्याची प्रेरणा देत आहेत.
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.