Published On : Wed, Apr 1st, 2020

९०० मिमी कन्हान जलवाहिनी वर उप्पलवाडी येथे इमर्जेन्सी शटडाऊन

नागपूर: नागपूर महानगरपालिका व NHAI यांनी कन्हान ९०० मिमी व्यासाच्या मुख्य वितरण वाहिनीवर कामठी मार्गावरील उप्पलवाडी पूल येथे इमर्जन्सी शटडाऊन घेतले आहे.

६ तासांचे हे शटडाऊन बुधवार १ एप्रिल २०२० रोजी दुपारी ३:१५ वाजता सुरु झाले. येथे उल्लेखनीय आहे कि, ही वाहिनी दोनवेळा NHAIच्या कंत्राटदारांकडून क्षतिग्रस्त झाली होती ज्यांमुळे उत्तर नागपूरचा पाणीपुरवठा बाधित झाला होता. या इमर्जन्सी शटडाऊनमुळे आज बुधवार दि. १ एप्रिल रोजी संध्याकाळी बिनाकी, बस्तरवारी, इंदोरा व बेझनबाग जलकुंभांवरील पाणीपुरवठा बाधित राहील.

Gold Rate
Saturday 25 Jan. 2025
Gold 24 KT 80,700/-
Gold 22 KT 75,100/-
Silver / Kg 92,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उद्या दि. २ एप्रिल (गुरुवार) रोजी सकाळचा पाणीपुरवठा जलवाहिनीचे काम रात्री ९ वाजेपर्यंत पूर्ण होण्यावर अवलंबून राहील.

मनपा-OCW यांनी बाधित भागातील नागरिकांना पुरेशा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. जलकुंभ स्वच्छतेदरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठादेखील शक्य होणार नाही.

नागरिकांना होणाऱ्या गैरसोईबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत.

For any other information or complaints regarding water supply please contact NMC-OCW Toll Free Number: 1800-266-9899

Advertisement