नागपूर: नागपूर महानगरपालिकेने विद्यमान कन्हान 900 मिमी फीडर लाईनसह 800 मिमी नवीन सक्करदरा फीडरचे इंटरकनेक्शन करण्याकरिता 12 तासाचे शटडाऊन येत्या 28 डिसेंबर 2022 (बुधवारी) रोजी सकाळी 10:00 ते रात्री 10:00 पर्यंत करण्याचे नियोजित केले आहे.
नागपूर महानगरपालिकेने बंद कालावधीत खालील कामे प्रस्तावित केली आहेत –
1.विद्यमान कन्हान 900 मिमी फीडर लाईनसह 800 मिमी नवीन सक्करदरा फीडरचे इंटरकनेक्शन
शटडाऊन कालावधीत पाणी पुरवठा प्रभावित क्षेत्रे खालीलप्रमाणे आहेत –
सक्करदरा 3 जलकुंभ-आझाद कॉलनी, निराला सोसायटी, यशीन प्लॉट, जुनी बिडीपेठ, नवीन बिडीपेठ, राजीव गांधी नगर, नवीन सुभेदार, थावरे कॉलनी, सुदर्शन कॉलनी, ठाकूर प्लॉट, शिक्षक कॉलनी. शिवांगी सोसायटी,अख्तेर ले- आउट,मसेब कॉलनी,गुरुदेव नगर,श्रीराम नगर,संजय गांधी नगर,रुक्मिणी नगर,आशीर्वाद नगर,ताजबाग,तौहीद नगर
सक्करदरा १ & २ जलकुंभ –चक्रधर नगर, सर्वे ले-आऊट, जवाहर नगर, जुने सुभेदार नगर, सेवादल नगर, सोनझरी नगर, जुना सक्करदरा,दत्तात्रय नगर, शिर्डी नगर, दुर्गा नगर, रघुजी नगर, अयोध्या नगर, जुना व न्यू कैलास नगर, उदय नगर, आंबटकर नगर. , श्रीराम वाडी, पूर्व बालाजी नगर, आदिवासी लेआउट, बँक कॉलनी, आरएमएस कॉलनी, लवकुश नगर, श्री नगर, गावडे पुरा, राणी भोंसले नगर, सच्चिदानंद नगर.
१२ तास शट डाऊन कामानंतरच ह्या बाधित भागांना -त्या त्या भागातील वेळेनुसार (समयसारिणीनुसार) पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी .
ह्या शटडाऊन कालावधी दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी ह्या कामादरम्यान सहकार्य करावे.
इतर कुठल्याही माहितीकरिता मनपा -OCW मदत क्रमांक १८००२६६९८९९ वर संपर्क करावा .