नागपूर: प्रत्येक घराला स्वच्छ, सुरक्षित व मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या आपल्या ध्येयासोबतच OCWने “समर्थ, महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास केंद्र” हा आणखी एक सामाजिक उपक्रम ‘उपाय’ या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हाती घेतला आहे.
पहिल्या समर्थ केंद्राचे उद्घाटन दि. २५ मे २०१८ रोजी OCWचे सीईओ संजय रॉय यांच्या हस्ते OCWचे निदेशक केएमपी सिंह यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या केंद्रात इच्छुक मुलींना आणि महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात येईल जेणेकरून या मुली व महिला स्वावलंबी बनून कुटुंबालाही हातभार लावू शकतील. ही कल्पना ‘उपाय’ संस्थेने पुढे आणली व OCWने तिला प्रत्यक्षात उतरविले.
OCW व उपाय २०१६ पासून एकत्रितपणे काम करत आहेत. २०१६ मध्ये प्रथम याच लक्ष्मी नगर स्लममध्ये ‘रीच अँड टीच सेंटर’ची स्थापना वस्तीतील गरीब मुलांना मुलभूत शिक्षण देऊन स्वत:चा अभ्यास स्वत: करण्यास त्यांना सक्षम करणे जेणेकरून त्यांनी अवेळी शालेय शिक्षण सोडू नये या उद्देशाने करण्यात आली.
उपाय (UPAY-Underprivileged’s Advancement by Youth) ही संस्था २०१० पासून अत्यंत तळमळीने शिक्षण व स्वावलंबन या उद्देशाने काम करत आहे.
OCW नागपूर शहरात अखंडित पाणीपुरवठा योजना PPP तत्वावर राबवीत आहे. आपले मुख्य काम करत असतानाच OCWने कायमच PPPमध्ये ‘पीपल’ हा चौथा P सोबत घेण्यावर विश्वास ठेवला आहे. नागरिकांना या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी OCW ‘जलसंवाद’ व ‘मॉडेल स्लम डेव्हलपमेंट’ यासारखे अनेक उपक्रम चालवत असते.
मॉडेल स्लम उपक्रमांतर्गत सामान्य तसेच कॅन्सरसारखी रोगांबाबत आरोग्यजागृती शिबिरे, मोफत आरोग्य चिकित्सा शिबिरे असे अनेक कार्यक्रम घेतले जातात. वर उल्लेख केलेले रीच अँड टीच सेंटर हे देखील मॉडेल स्लम अंतर्गतच स्थपीत करण्यात आले आहे. आता ‘समर्थ’ हा नवीन उपक्रम OCW व उपाय दोघांनीही आपल्या सामाजिक उत्थानाच्या ध्येयाला समोर ठेऊन सुरु केला आहे.
शुक्रवारी, समर्थ केंद्राचे उद्घाटन रोजी OCWचे सीईओ संजय रॉय यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी OCWचे निदेशक केएमपी सिंह, वरिष्ठ व्यवस्थापक फरहत कुरैशी तर उपायकडून अर्चना श्रीवास्तव, रीना अग्रवाल, रोहित पिंपळे, अनुश्री काकडे, भारती सरायकर, नीतू मिश्रा, प्रियांका उईके, मोहित उईके, अमोल नैताम उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन रिचा चौधरीने केले. कार्यक्रमाला लक्ष्मी नगर स्लममधील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.