नागपूर: Orange City Water (OCW) आपल्या ग्राहकांसाठी नवीन आणि अधिक सुधारित मोबाईल ॲप लाँच करण्याच्या प्रक्रियेत आहे. यासाठी ठराविक कालावधीची आवश्यकता आहे. या अपग्रेडद्वारे अधिक प्रगत फिचर्स आणि सुलभ कार्यक्षमतेसह ग्राहकांचा अनुभव सुधारण्याचा उद्देश आहे.
या बदलाचा भाग म्हणून, Nagpur Water ॲप आणि OCW पोर्टल 11 डिसेंबर 2024 च्या सायंकाळपासून 20 डिसेंबर 2024 पर्यंत तात्पुरते अनुपलब्ध आहेत. या कालावधीत ग्राहकांना ॲप व पोर्टलच्या सेवांचा वापर करता येणार नाही.
या काळात होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही मनःपूर्वक दिलगीर आहोत आणि आपल्या संयम व सहकार्याबद्दल आभारी आहोत. आमची टीम नवीन ॲपची सुलभ आणि वेळेवर सुरूवात सुनिश्चित करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे.
जलपुरवठा संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाईन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.