नागपूर : देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढा पुकारणाऱ्या आणि स्वत:च्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या वीर क्रांतिकारक सुखदेव, भगतसिंह, राजगुरु यांच्या बलिदान दिवसानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सिव्हील लाईन मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. व सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर आदी उपस्थित होते.